यवतमाळ कोषागाराच्या या ब्लॉगवर आपले स्वागत आहे.
महाराष्ट्र राज्याच्या माहिती तंत्रज्ञान धोरणानुसार शासन आता अधिक लोकाभिमुख होण्याकरिता Website, Mail, Blog ई. संगणकीय प्रणालीद्वारे सुसज्ज होत आहे. त्यातील एक पाउल म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागातील, संचालनालय लेखा व कोषागारे, यांचा हा उपक्रम आपणा सर्वांसाठी....
कोषागार म्हणजे जिल्ह्यातील सर्व शासकीय प्रदाने करणारे कार्यालय होय.तसेच जिल्ह्यातील सर्व निवृत्ती वेतन धारकांना त्यांचे निवृत्तीनंतर शासनाने करावयाचे सर्व प्रदाने याच कार्यालातून केली जातात. मासिक निवृत्ती वेतन, शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन, शासकीय कार्यालयांच्या इतर देयाकांचे लेखापरीक्षण, देयक प्रदान झाल्यानंतर त्याचे शासनाच्या हिशेबाकरिता त्याचे संकलन करण्यात येते.
कोशागाराने आपल्याशी सवांद साधण्याकरिता, आपले अभिप्राय करिता सुरु केलेल्या ह्या उपक्रमास प्रतिसादाच्या अपेक्षेत...या भेट द्या, जाणून घ्या.. आणि आपले मत नोंदवा..
यापुढे महत्वाच्या सूचनांसाठी नियमितपणे या संकेतस्थळावर भेट द्यावी.
No comments:
Post a Comment