जमा-खर्च ताळमेळाबाबत आयोजित कार्यशाळेचे वृत्तांत:
काळ दि.३०/११/२०११ रोजी बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे दुपारी ३.०० वा. मा.महालोखापाल स्तरावर दर तिमाही नंतर घेण्यात येणाऱ्या जमा-खर्च ताळमेळात निर्माण होणार्या अडचणीचे निराकरण करण्याकरिता आहारान व संवितरण अधिकारी कोषागारात जी देयके सादर करतात/चालन जमा करताना कोणती दक्षता घ्यावी. याबाबत सूचना देण्यात आल्या तसेच आहारान व संवितरण अधिकारी/प्रतिनिधी यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले.
या कार्याशालेकारिता अध्यक्ष म्हणून श्री. पाथ्रडकर साहेब, लेखाधिकारी, सहसंचालक ले व को. कार्यालय, अमरावती, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कोषागार अधिकारी श्री. शाम देव साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती काळे, लेखाधिकारी, कृषी विभाग, यवतमाळ या उपस्थित होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. श्री. उमेश बबरूले, अप्पर कोषागार अधिकारी, यवतमाळ, श्री. सु. य. भट, उपकोषागार अधिकारी,यवतमाळ. श्री. गावंडे साहेब, उपकोषागार अधिकारी, सहसंचालक ले व को. कार्यालय, अमरावती लाभले होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना मा. कोषागार अधिकारी श्री. देव साहेब यांनी केली, मा. महालेखापाल यांना अचूक लेखा सादर करण्याची कोषागाराची भूमिका व त्याकरिता आवश्यक आहारान व संवितरण अधिकारी/प्रतिनिधीचे सहकार्य याबाबत मत व्यक्त केले. कोषागार संगणकीकृत होण्याच्या संक्रमण अवस्थेत असल्याने तसेच संगणीकृत झाल्यानंतर कोषागार /आहारान व संवितरण अधिकारी/प्रतिनिधीचे खुप काम कमी होणार असल्याने संगणकीकृत काम करताना अचूकता ठेवण्याची आवशकता नमूद केली.
श्री. भट यांनी कोशागाराचे दैनिक कामकाज, देयकाचा स्क्रोल ते डिलिवरी पर्यंत होणारा प्रवास/ जमेच्या चालन बँकेत सादर करताना ग्यावयाची काळजी त्यावरी अचूक योजना संकेतांक, आहारान व संवितरण अधिकारी संकेतांक,BDS प्राधिकर पत्र तयार करताना स्थानांतरीत रकमांचे अचूक योजना संकेतांक, मु. ले. शी. ८००९, ७६१०, ८३३६, ००४९, ८३४२, ई. वाजती व त्यांची योग्य विवरणे याबाबतीत सखोल मार्गदर्शन केले.
डॉ. श्री. बबरुले यांनी अचूक देयके कशी सादर करावीत, आक्षेपांचे पुनरावृत्ती कशी टाळावी, वेळोवेळी ताळमेळ घेतल्यामुळे होणारा फायदा, देयाकाशोबत योग्य ती प्रमाणपत्रे कशी सादर करावीत. ई. बाबत सूचना वजा मार्गदर्शन केले. तसेच कोशागारांच्या विविध website बद्दल महत्वाची माहिती दिली.
यानंतर उपकोषागार अधिकारी श्री गावंडे यांची मा. महालेखापाल यांच्याशी online ताळमेळ कसा करावा याच्या पद्धती नमूद केल्या. online ताळमेळ केल्याने कर्मचारी व कार्यालयाचा वेळ व खर्च वाचतो. तसेच योग्य ताळमेळ होण्यास मदत होते असे मत व्यक्त केले.
online तालामेळाचे मार्गदर्शन झाल्यानंतर कार्यशाळेचे अध्यक्ष श्री. श्री. पाथ्रडकर साहेब, लेखाधिकारी, सहसंचालक ले व को. कार्यालय, अमरावती, यांनी कोषागार व मा महालेखापाल यांची भूमिका विषद केली व आहारान व संवितरण अधिकारी/प्रतिनिधींनी वेळोवेळी ताळमेळ करून घेण्याबाबत मत व्यक्त केले.
यानंतर उपस्थित आहारान व संवितरण अधिकारी/प्रतिनिधीच्या प्रश्नांची उत्तरे देऊन समस्यांचे निराकरण करण्यात आले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील आहारान व संवितरण अधिकारी/प्रतिनिधी कडून भरघोस प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. भीमराव वानखडे यांनी केले तर श्री. बोर्घाते यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्याशालेकरिता श्री. सुभाष राऊत, उपलेखापाल, संकलन विभाग, कोषागार कार्यालय यवतमाळ, श्री. चंद्रशेखर राऊत, श्री चौधरी, कु. भडांगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment