...स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम....यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे ...

Tuesday, 27 August 2024

VPDA कार्यशाळा ठिकाण बदलल्याबाबत सूचना

 VPDA कार्यशाळा ठिकाण बदलल्याबाबत सूचना

दिनांक 28/08/2024 रोजी होणारी VPDA कार्यशाळा कोषागार कार्यालय, यवतमाळ ऐवजी बळीराजा चेतना भवन (बचत भवन) जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे होणार आहे. संबंधीतांनी याबाबत नोंद घ्यावी.

VPDA Training

 

      विषय : सहायक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी आहरण व संवितरण आणि अन्य अशासकीय कार्यान्वय प्राधिकारी यांचे करिता आभासी वैयक्तीक ठेव लेखा (VPDA‍) हि व्यवस्था व कार्यपध्दत लागू करणेचे अनुषंगाने प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत.


सहायक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी आहरण व संवितरण अधिकारी आणि अन्य अशासकीय कार्यान्वयन प्राधिकारी यांचेकरिता आभासी वैयक्तीक ठेव लेखा (Virtual Personal Deposit Accounts ) VPDA ही व्यवस्था व कार्यपध्दती संदर्भिय शासन निर्णयाव्दारे लागू करण्यात आलेली आहे.

त्याअनुषंगाने आभासी वैयक्तीक ठेव लेखा (Virtual Personal Deposit Accounts ) VPDA‍ हि व्यवस्था व कार्यपध्दत लागू करणेचे अनुषंगाने दिनांक 28/08/2024 रोजी सकाळी 11.00 वाजता कोषागार कार्यालय यवतमाळ येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणास आपण व आपले कार्यालयातील संबंधीत कार्यासनाचे अधिकारी / कर्मचारी यांनी उपस्थित राहावे हि विनंती.


Thursday, 15 August 2024

CMP Login करण्याकरिता URL मध्ये बदल

 


सर्व आहरण व संवितरण अधिकारी

CMP Login करण्याकरिता URL मध्ये बदल झालेला आहे. तेव्हा CMP Login करण्याकरिता  

https://cmp.onlinesbi.com/mahakosh या लिंक ऐवजी खालील URL चा उपयोग करावा.


https://cmpportal.sbi