...स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम....यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे ...

Friday, 4 November 2011

निवृत्ती वेतन धारकांना सूचना


जाहीर आवाहन 
                   सर्व निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना कळविण्यात येते कि, शासन परिपत्रक वित्त विभाग क्र.टीआरडब्लू-१३८०/९९०२ /पीआर/एदिएम-९ दिनांक २२/०३/१९८१ व  टीआर दब्लू-१३८०/ १४८४/ सीआर-३४७/कोष-४/दिनांक१५/०५/१९८७ नुसार सर्व निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारकानी दिनांक १ नोव्हेंबर रोजीचा सक्षम  प्राधिकारी यांनी सही केलेला हयातीचा दाखला त्यांनी निवडलेल्या ब्यान्केमार्फत नोव्हेंबर २०११   अखेरपर्यंत सादर करावा. अन्यथा  निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांचे माहे डिसेंबर २०११ पासून पुढील निवृत्तीवेतनाचे प्रदान त्यांचा हयातीचा दाखला कोशागारास प्राप्त होईपर्यंत रोखून   ठेवण्यात येईल याची सर्व निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारकानी  नोंद घ्यावी. 
                    तसेच निवृत्तीवेतन/ कुटुंबनिवृत्तीवेतन खंडित होण्याचे टाळण्यासाठी ६० वर्षाखालील कुटुंब निवृत्तीवेतनधारक  यांनी महाराष्ट्र कोषागार नियम ३४२ मधील तरतुदीनुसार पुनःर्विवाह न केल्याबाबतचा दाखला (महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ मधील नियम क्र. ३३२ मध्ये नमूद केलेले सक्षम अधिकारी यांच्या सही शिक्यासह ) तसेच महाराष्ट्र कोषागार नियम ३४३ नुसार शासकीय/निमशासकीय नोकरीत किंवा शासन अंगीकृत संस्थांमध्ये काम करीत नसल्याचा दाखला (सक्षम अधिकारी यांच्या सही शिक्यासह.)सर्व निवृत्तीवेतनधारक/ कुटुंबनिवृत्तीवेतन धारक यांनी हयातीच्या दाखल्यासोबत कोशागारास सादर करावा ही विनंती.



No comments:

Post a Comment