कोषागाराचे संपूर्ण कामकाज आता संगणकीकृत होण्याच्या दृष्टीने यवतमाळ जिल्ह्यातील सर्व १५ उपकोशागरात आता SubTreasuryNet उपकोषागार प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. आहरान व संवितरण अधिकारी सादर करीत असलेली देयके इ-स्क्रोल पद्धतीने स्वीकारण्यात येणार असून देयाकाचा उपकोषागार प्रणालीमधील संपूर्ण प्रवास Koshwahini या संकेतस्थळावर दिसणार आहे. बँकेत भरणा केलेली चलाने, बँक देयके, कोषागार धनादेश, स्वीय प्रपंजी लेख्याचे धनादेश संपूर्णरीत्या संगणकीय प्रणालीने लेखांकित करण्यात येणार आहे.
उपरोक्त प्रणालीचे सर्व उपकोषागार अधिकारी, त्यांचे अधिनस्त कर्मचारी व कोषागारातील इतर कर्मचाऱ्यांचे दिनांक २४ मार्च २०१२ रोजी कोषागारात सकाळी ११.०० वा. प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणास मा. कोषागार अधिकारी श्री. शामसुंदर देव, अप्पर कोषागार अधिकारी श्री. उमेश बबृले तसेच सर्व उपकोषागार अधिकारी, अधिनस्त कर्मचारी तसेच कोषागारातील कर्मचारी उपस्थित होते.
प्रशिक्षण सत्रात SubTreasuryNet उपकोषागार प्रणाली, अर्थवाहिनी , koshwahini , इ-मेल, KRA इ. बाबींचे LCD Projecter द्वारे प्रशिक्षण देण्यात आले. SubTreasuryNet उपकोषागार प्रणाली प्रशिक्षणात Authorisation Import , देयकाचा प्रणालीमधील प्रवास , स्वीय प्रपंजी धनादेशाचा प्रणालीमधील प्रवास, बँक देयक, कोषागार धनादेश, जमा चलन इ. बाबींची खतावणी, प्रणालीचा दैनिक Backup घेणे. Pending bill file Koshawahini संकेत्स्तलावर upload करणे. तसेच मेल account ची हाताळणी इ. बाबीचे प्रत्याशिक सारावाद्वारे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले. SubTreasuryNet उपकोषागार प्रणाली मध्ये एकूण चार module (Scroll - so01/ Audit - ao01/ PLA-po01/ DBA) पुरविण्यात आले असून त्या module चा खालीलप्रमाणे उपयोग होणार आहे.
१) Scroll -so01 - देयक इ-स्क्रोल पद्धतीने स्वीकारणे, चलनांची, बँक देयक, कोषागार धनाधेश खतावणी.
२) Audit -ao01 - देयाकाचे लेखापरीक्षण, दैनिक बंद, कोशवाहिनी वरील प्रलंबित देयकाचा data प्रक्षेपित करणे
३) PLA -po01 - स्वीय प्रपंजी धनादेशाची कार्यवाही.
४) DBA - SubTreasuryNet उपकोषागार प्रणाली नियंत्रित करणे.
प्रशिक्षणा दरम्यान उपकोषागार अधिकारी, कर्मचारी यांचेकडून आलेल्या सर्व प्रश्नांचे निराकरण करण्यात आले व सूचना नोदाविण्यात आल्या.
या प्रशिक्षणाकरिता Sys . Administrator श्री. चंद्रशेखर राउत, Techinical Assitant श्री. निखील शिरगिरे तसेच वर्ग-४ कर्मचारी श्री दीपक इंगोले यांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment