...स्वागतम.....स्वागतम....सुस्वागतम....यवतमाळ कोषागार कार्यालयाच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे ...

Tuesday, 27 March 2012

आर्थिक वर्षाअखेर सर्व विभागणी पाळावयाच्या सूचना


आर्थिक वर्षाअखेर सर्व विभागणी पाळावयाच्या सूचना 


१)            वित्त विभागाची सहमती प्राप्त झालेल्या अनुदानाचे वितरण बीम्स प्रणालीद्वारे त्याच दिवशी संबंधित विभागाकडून क्षेत्रीय अधिकार्यांना करण्यात यावे.


२)           दिनांक ३१.०३०२०१२ रोजी रात्री ७.०० वाजेपर्यंत जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत देयके स्वीकारण्यात येतील. उपकोश्गारातून प्रदान आदेशाद्वारे बँकेतून प्रदान होत असल्याने तसेच बँकेच्या कामकाजाची वेळ विचारात घेऊन उपकोशागरात सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत देयके स्वीकारली जातील. त्याचप्रमाणे आक्षेप लावून परत केलेल्या देयाकासंदर्भात वरील वेळेचे बंधन राहील. या अनुषंगाने सर्व कार्यालय प्रमुखांना वरील वेळेचे आत देयके सादर करण्याबाबत याद्वारे स्पष्ट सूचना देण्यात येत आहे.
               वरील वेळेनंतर कोणत्याही प्रकारची देयके कोषागारात/उपकोशागरात स्वीकारली जाणार नाहीत.  तसेच त्यामुळे एखाद्या विभागाचा निधी व्यपगत झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी  संबंधित विभागाची राहील.          


३)           सर्व देयके अर्थसंकल्प अंदाज  वितरण व सनियंत्रण प्रणाली (BEAMS ) द्वारे काढलेल्या प्राधिकर पत्रासह सादर करणे आवश्यक आहे. 




शा. व. देव 
जिल्हा कोषागार अधिकारी
यवतमाळ 

No comments:

Post a Comment