महत्वाची सूचना
नवीन सेवार्थ प्रणालीत प्रवेश करण्यासाठी (For Login)
सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना कळविण्यात येते की, नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये प्रवेश करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या दहा अंकी आहरण व संवितरण अधिकारी संकेतांकाऐवजी संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचा ११ अंकी सेवार्थ इम्प्लोई कोड नमूद करावा. युजर आयडी बाबत माहिती संबंधित कोषागारात उपलब्ध करण्यात आलेली आहे.
ज्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना नवीन प्रणालीत प्रवेश करण्यासाठी तांत्रिक अडचण येत असेल अथवा कोषागार कार्यालयात युजर आयडी बाबत माहिती प्राप्त झाली नसेल अशा आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी आवश्यक तपशीलासह खालील नमूद केलेल्या ईमेल संदेशावर संपर्क साधावा.
- ad.sevaarth@mahakosh.in
- jd.reforms@mahakosh.in
उपरोक्त युजर आयडी नोंदविल्यानंतर, पासवर्ड संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची जन्म तारीख असेल उदा. (DDMMYYY)-01019999
आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी लॉगीन केल्यानंतर प्रथमत: लगेचच सदर पासवर्ड बदल्याकरीता स्क्रीन दिसेल त्यानुसार पासवर्ड बदलण्यात यावा.
पासवर्ड बदलल्यानंतर त्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना सहाय्यक म्हणून काम करण्यासाठी आवश्यक त्या कर्मचाऱ्याची / अधिकाऱ्यांची नोंद Work list > Payroll > Map DDO Assistant येथून करावी. सदर अधिकारी / कर्मचाऱ्याचा सेवार्थ इम्प्लोई कोड नोंदविण्यात यावा. (For Example – PLRMNHF2201) आणि पासवर्ड जन्मतारीख (DDMMYYY)-01019999
देयकांचे संस्करण (Pay Bill Processing)
ज्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी जुन्या सेवार्थ प्रणालीमध्ये माहे मार्च २०१२ ची देयके प्रमाणक क्रमांक व दिनांक टाकून नोंदविली असतील अशा आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी माहे एप्रिल २०१२ देय मे २०१२ ची देयके नवीन प्रणालीतून आवश्यक बदलासह संस्करीत (Processing) करावीत.
ज्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी जुन्या सेवार्थ प्रणालीमध्ये माहे मार्च २०१२ ची देयके प्रमाणक क्रमांक व दिनांक टाकुन नोंदवली (Locked) नसतील अशा आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी प्रथम माहे मार्च २०१२, देय एप्रिल २०१२ चे वेतन देयक संस्करीत (Processing) करून तसेच व्हेरीफाय करून सदर देयकाचा अचूक प्रमाणक क्रमांक व दिनांक नोंद करावा व त्यानंतरच माहे एप्रिल २०१२ देय मे २०१२ चे देयक नवीन प्रणालीतून संस्करीत (Processing) करावे.
DCPS कर्मचाऱ्यांच्या देयकाबाबत प्रथमत: DCPS contribution आहरण व संवितरण अधिकाऱ्यांस फोरवर्ड करावे व तेथून सदर contribution कोशागारास फोरवर्ड करावे व त्यानंतरच मासिक देयके संस्करीत (Processing) करावीत याबाबत विशेष दक्षता घ्यावी.
ज्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडे एकापेक्षा अधिक कार्यालयांचा अतिरिक्त कार्यभार असेल अशा आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी लॉगीन केल्यानंतर दुसऱ्या कार्यालयासाठी लॉगीन करण्याकरीता होमपेज वरील स्वीच पोस्ट यावर क्लिक करून आवश्यक माहिती भरून त्याप्रमाणे दुसऱ्या कार्यालयाबाबत प्रणालीमध्ये काम करू शकतील.
Important Notice
Login -
All DDOs are required to login by using their 11 digit Sevaarth ID (For Example – ESTBVNM2201) mentioned in the list available at respective Treasuries.
DDOs whose Sevaarth IDs are not available in the list are requested to contact –
- ad.sevaarth@mahakosh.in
- jd.reforms@mahakosh.in
Password will be date of birth (DDMMYYYY) For Example – 01019999
After DDO login a screen will be displayed for changing the password
After changing the password, a screen will be displayed. DDOs are required to map DDO Assistants through the same screen. The username for mapped assistants will be Sevaarth ID (For Example – PLRMNHF2201) and Password will be date of birth (DDMMYYYY) For Example – 01019999
Bill Generation -
DDOs who have already locked the pay bills for the month of March, 2012 in Old Sevaarth by entering Voucher Number and Date - Generate pay bill for the month of April, 2012 in New Sevaarth by making required changes for that month.
DDOs who have not locked the pay bills for the month of March, 2012 in Old Sevaarth - Generate the pay bill for the month of March, 2012 in New Sevaarth, verify and lock the same by entering Voucher Number and Date and then process pay bill for the month of April, 2012 by making required changes for April, 2012 month.
Kindly note that, in case of pay bills with DCPS employees, DCPS contributions has to be forwarded from DDO Assistant to DDO and from DDO to Treasury as explained in the user manual available in the login.
DDOs having additional charge of more than one office, should go to “Switch Post” option on home page, select the desired office and change the details of the same.
उपरोक्त प्रणालीमध्ये काम करताना कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास यवतमाळ कोषागारातील खालील प्रमाणे नियुक्त करण्यात आलेल्या Master Trainer यांचेशी संपर्क साधण्यात यावा.
१) श्री विनोद गीते - 9420920917
२) श्री. के एल सैयद - 9420773544
३) श्री. राजेश आढाव - 9421848326
४) श्री सतीश दुमारे -9970130682
५) कु. मीनल भडांगे -9763350005
No comments:
Post a Comment